Bollywood Actor | बॉलिवूडचा ‘अँग्री यंग मॅन’ अशी ओळख असलेल्या अभिनेत्याने नुकतीच एक गुडन्यूज शेअर केलीय. इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्याने ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेता वयाच्या 49 व्या वर्षी बाबा झाला आहे. त्याने बाळाची एक गोंडस झलकही दाखवली. त्यामुळे सध्या अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे.
आपण बोलत असलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून रणदीप हुड्डा आहे. रणदीपची पत्नी मॉडेल अभिनेत्री लिन लैशराम हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दोघांच्या आयुष्यात आता एका नव्या आणि अतिशय सुंदर पर्वाची सुरुवात झाली आहे. काल, 10 मार्च रोजी दोघेही आई-बाबा झाले.
मार्च 2026 रोजी या दांपत्याने एका गोंडस मुलीचे स्वागत केले आहे. विशेष योगायोग म्हणजे, ज्या दिवशी रणदीपच्या मुलीचा जन्म झाला, त्याच दिवशी त्याच्या वडिलांचाही वाढदिवस होता. या दुहेरी आनंदामुळे हुड्डा कुटुंब सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असून रणदीपने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करून ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.
रणदीपने इंस्टाग्रामवर आपल्या मुलीची पहिली झलक दाखवणारे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. पहिल्या छायाचित्रात रणदीपचे वडील आपल्या नातीला कुशीत घेऊन बसलेले दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत या चिमुकल्या परीच्या इवल्याशा हातांचा फोटो आहे. आपल्या वडिलांना आणि मुलीला शुभेच्छा देताना रणदीपने हरयाणवी भाषेतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
रणदीपने कॅप्शनमध्ये लिहिले की, आज जेव्हा मी स्वतः वडील झालो आहे, तेव्हा बाबा, तुमच्याबद्दलचा माझा आदर आणि प्रेम अधिकच वाढले आहे. यासोबतच त्याने आपली पत्नी लिनचे आभार मानताना म्हटले की, मला बाबा बनवल्याबद्दल आणि आपल्या छोट्या लेकीला या जगात आणल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. हुड्डा कुटुंबातील या नव्या पाहुणीच्या आगमनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
रणदीप आणि लिन दोघांची पहिली भेट प्रसिद्ध अभिनेता Naseeruddin Shah यांच्या थिएटर ग्रुप Motley Productions मध्ये झाली होती. सुरुवातीला ते चांगले मित्र होते, परंतु कालांतराने त्यांची मैत्री प्रेमात बदलली. अनेक वर्षे त्यांनी आपले नाते खाजगी ठेवले आणि नंतर २०२२ च्या दिवाळीत त्यांनी आपले नाते अधिकृतपणे जाहीर केले. यानंतर 29 नोव्हेंबर 2023 रोजी या जोडप्याने मणिपूरची राजधानी Imphal येथे पारंपारिक मेईतेई पद्धतीने लग्न केले. त्या लग्नातील पारंपारिक पोशाख आणि साधेपणामुळे त्यांचा विवाह सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिला होता.
आता या जोडप्याच्या आयुष्यात बाळ मुलीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण आहे. रणदीप आणि लिनच्या या नव्या प्रवासासाठी चाहते आणि मित्रमंडळी त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत.






