Animal सिनेमात रणबीर कपूरसोबत माझा किसिंग सीन!; बॉबी देओलचा धक्कादायक खुलासा

On: December 14, 2023 12:02 PM
Animal Cinema Bobby Deol Ranbir Kapoor
---Advertisement---

Animal | बॉलिवूडमध्ये सध्या फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची चर्चा आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित अॅनिमल सिनेमानं सध्या बॉक्स ऑफीसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कमाईचे आतापर्यंतचे सर्व आकडे तोडत हा सिनेमा निघाला आहे. आता या सिनेमातील एका दृश्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. हे दृश्य रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांच्यामधील आहे.

बॉबी देओलने एका मुलाखतीत एक नवा खुलासा केला आहे, त्याने सांगितले की त्याचे पात्र अबरार आणि रणबीर कपूरचं (Ranbir Kapoor) पात्र रणविजय यांच्यामध्ये सिनेमाच्या क्लायमॅक्सवेळी एक किसिंग सीन होता, मात्र दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने तो काढून टाकला आहे.

नेमकं काय म्हणाला बॉबी देओल?

द क्विंटशी बोलताना बॉबी देओल (Bobby Deol) म्हणाला की, “हे दोन भाऊ आहेत, त्यांना एकमेकांना मारायचं आहे, मात्र त्यांच्यात प्रेम सुद्धा आहे. आम्ही क्लायमॅक्स शूट करत असताना पार्श्वभूमीवर एक गाणं वाजत आहे जे प्रेमाबद्दल आहे. या सर्व फाईटिंग सीनमध्ये आमचा एक सीन होता ज्यामध्ये अबरार आणि रणविजय एकमेकांना किस करतात ” (Animal Movie)

बॉबी देओलने सांगितलं की, “रणबीर आणि माझ्यातला फाईट सीन शूट करताना संदीप रेड्डी वांगाने आमच्याकडून हा किसिंग सीन (Kissing Scene) करुन घेतला. जो सिनेमाचा एख महत्त्वाचा भाग होता. आमच्यातील प्रेम दाखवण्यासाठी हा शूट केला होता, मात्र नंतर त्यावर चर्चा झाली. या सीनमुळे वाद निर्माण होऊ शकतो अशी शक्यता होती. अखेर हा सीन सिनेमातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, बॉबी देओलने हे स्पष्ट केलं की सिनेमातून जरी हा किसिंग सीन काढला असला तरी नेटफ्लिक्सच्या आवृत्तीत मात्र या सीनचा समावेश केला जाऊ शकतो. अशी माहिती आहे की नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारी या सिनेमाची आवृत्ती मोठी असणार आहे म्हणजेच सध्याच्या सिनेमापेक्षा ती अधिक वेळाची असेल. मुख्य सिनेमात कापलेले अनेक सीन्स यामध्ये प्रेक्षकांना पाहता येतील.

बॉबी देओलचा आणखी एक खुलासा-

अॅनिमल सिनेमातील शेवटच्या एका दृश्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. हे दृश्य म्हणजे क्लायमॅक्सवेळी रणबीर कपूर खाली पडलेला असताना बॉबी देओल त्याच्या अंगावर झोपतो. या सीनबद्दल बॉबी देओलनं मोठा खुलासा केला आहे. “ही आयडिया सुद्धा संदीप रेड्डी वांगाची होती. आम्ही सराव करत असताना त्याला ही कल्पना सुचली. तो मला म्हणाला बॉबी तुला माहीत आहे का?, तू त्याला ठोसा मारायला हवा आणि तो खाली पडल्यावर त्याच्या अंगावर झोपायला हवं. हे दृश्य म्हणजे मीच शक्तिशाली आहे हे दाखवण्यासाठी होतं, मात्र तुम्हाला तर माहीतच आहे सिनेमात शेवटी नायकच जिंकतो, असं बॉबी देओल म्हणाला.

News Title: Bobby Deol Reveals Kiss Scene with Ranbir Kapoor in Animal

महत्त्वाच्या बातम्या-

Share Market | ‘या’ शेअरने दिला तिप्पट परतावा; गुंतवणूकदार मालामाल

Gautami Patil | ‘…आता भीती वाटते’; गौतमीने केला मोठा खुलासा

LIC वाल्यांना छप्परफाड कमाई, रिटर्न्सचे आकडे ऐकाल तर थक्क व्हाल

Viral Video | बीड येथील शिक्षकांचा नको तसला व्हिडीओ व्हायरल, सगळीकडे एकच खळबळ!

Deepika Padukone | रणबीर नाही-रणवीर नाही; दीपिकाला ‘या’ अभिनेत्यासोबत करायचं होतं लग्न

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now