लाडक्या बहिणींना लागली लॉटरी! महायुतीच्या वचननाम्यात मोठ्या घोषणा

On: January 11, 2026 1:41 PM
Maharashtra Cabinet Decision
---Advertisement---

Mahayuti | आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना-रिपाई या महायुतीने आपला अधिकृत वचननामा प्रसिद्ध केला आहे. या वचननाम्यात विशेषतः मुंबईतील महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाच्या आणि थेट लाभ देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. लाडक्या बहिणींना आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षम करण्यावर महायुतीने भर दिला आहे.

महिलांचा दैनंदिन प्रवास सुलभ करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि आरोग्य व सुरक्षिततेची हमी देणे, हा या वचननाम्याचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीच्या या घोषणांकडे महिला मतदारांचे विशेष लक्ष लागले आहे.

महिलांसाठी प्रवास, रोजगार आणि आरोग्यावर भर :

महायुतीच्या वचननाम्यानुसार मुंबईतील महिलांना बेस्ट बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यासोबतच शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता बेस्ट बसची संख्या ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बसथांब्यांवर सीसीटीव्ही, डिजिटल डिस्प्ले आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊन महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याचा संकल्प महायुतीने केला आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. लघुउद्योग, स्वयंरोजगार आणि छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी हे कर्ज उपलब्ध होणार असून, कोळी भगिनींसाठी मासळी बाजारात आधुनिक सुविधा आणि कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्याचे आश्वासनही वचननाम्यात देण्यात आले आहे.

Mahayuti | लखपती दीदीकडे वाटचाल; पारदर्शक कारभाराचा दावा :

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा करत महापालिकेच्या माध्यमातून स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच रात्रीच्या वेळी असुरक्षित वाटणाऱ्या भागांमध्ये प्रकाशव्यवस्था वाढवून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी लाडक्या बहिणींसाठीच्या योजनांबाबत भूमिका स्पष्ट करत, आता केवळ प्रशिक्षण आणि शिलाई मशीनपुरते न थांबता महिलांना उद्योगासाठी पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाईल, असे सांगितले. लाडक्या बहिणींचा प्रवास ‘लखपती दीदी’कडे नेण्याचा निर्धार करत महापालिकेच्या कारभारात एआयचा वापर करून पारदर्शकता आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

News Title : BMC Election 2026: Mahayuti Manifesto Promises Big Benefits for Women, Three Major Announcements Explained

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now