कोण राज ठाकरे? भाजप आमदाराचा थेट सवाल; राजकीय वातावरण तापलं!

On: January 15, 2026 12:24 PM
Latur ZP Election Result
---Advertisement---

Raj Thackeray | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मराठी मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच भाजपाच्या एका महिला आमदाराच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी माणसाचा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणला असताना, भाजप आमदार मनीषा चौधरी (Manisha Chaudhari) यांनी या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे यांनी प्रचारादरम्यान ‘ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे’ असे भावनिक आवाहन केले होते. मात्र मतदानाच्या दिवशीच भाजप आमदारांनी ठाकरे बंधूंच्या मराठी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘कोण राज ठाकरे?’ असा थेट सवाल केल्याने राजकीय चर्चेला वेग आला आहे.

‘कोण राज ठाकरे आणि कोण भगवा गार्ड?’ :

दहिसरच्या भाजप आमदार मनीषा चौधरी यांना मनसेच्या भगवा गार्डबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी “कोण राज ठाकरे आणि कोण भगवा गार्ड? मला त्यावर बोलायचे नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. यासोबतच त्यांनी दहिसर वॉर्ड क्रमांक 8 मधील मतदान प्रक्रियेतील अडचणींकडे लक्ष वेधले.

“अनेक मतदारांची नावे यादीत नाहीत. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Mahapalika) दिलेली मतदार यादी मतदान केंद्रावर उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि आम्ही त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रयत्न करत आहोत,” असे त्यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी शिवसेनेवरही टीका करत “बाळासाहेबांनी उभी केलेली भगवाधारी शिवसेना अजून अस्तित्वात आहे का?” असा सवाल उपस्थित केला.

Raj Thackeray | ‘मराठी माणूस बोलायचे आणि किचनमध्ये…’ :

मराठी मुद्द्यावरून ठाकरे बंधूंवर टीका करताना मनीषा चौधरी यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. “एका बाजूला मराठी माणसाबद्दल बोलायचे आणि दुसरीकडे त्यांच्या किचनमध्ये काम करणारे कोण आहेत ते बघा. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या किचनमध्ये सगळे नेपाळी आहेत,” असा थेट टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मतदान प्रक्रियेबाबत बोलताना मनीषा चौधरी (Manisha Chaudhari) यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. “मी मतदान केंद्रात आत गेले नव्हते, पण माझे कर्तव्य बजावत आहे. मोठ्या प्रमाणावर गोंधळ असून हा निवडणूक आयोगाचाच हलगर्जीपणा आहे,” असा आरोप त्यांनी केला. दहिसर वॉर्ड 8 मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवार योगिता पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांत जोरदार मोर्चेबांधणी केल्याचेही दिसून आले होते.

News Title: BMC Election 2026: BJP MLA Targets Raj Thackeray Over Marathi Issue

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now