काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपची खुली ऑफर

On: February 16, 2023 7:52 PM
---Advertisement---

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून काॅंग्रेसचे(Congress) जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) भाजमध्ये(BJP) जाणार असल्याच्या चर्चा आहेत. परंतु अशोक चव्हाण यांनी बऱ्याचदा या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

त्यातच आता भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांनी अशोक चव्हाण यांना भाजमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. काॅंग्रेसचं काही भविष्य राहिलेलं नाही, त्यामुळं अशोक चव्हाण यांनी आता विचार करायला हवा, असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे.

काॅंग्रेसकडून लोकांना जास्त अपेक्षा राहिल्या नाहीत, त्यामुळं चव्हाण यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करायला हरकत नाही, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.

आता विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांना भाजमध्ये येण्यासाठी दिलेल्या ऑफरनंतर विविध चर्चांणा उधाण आलं आहे. त्यामुळं अशोक चव्हाण यावर प्रतिक्रिया देतील का?, किंवा काय प्रतिक्रिया देतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा पूर्वी काॅंग्रेसमध्ये होते. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीआधी विखे पाटील काॅंग्रेसमधून विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now