‘बाळासाहेबांना उसन्या भाटांची गरज पडली नाही’; अंबादास दानवे कडाडले

On: March 28, 2024 5:19 PM
BJP Star Campaigners
---Advertisement---

BJP Star Campaigners | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. स्टार प्रचारक (BJP Star Campaigners) म्हणून भाजपच्या नेत्यांचं पहिल्या दहामध्ये नाव आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर काही भाजप नेत्यांचा समावेश केला आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीकेचे बाण सोडले आहेत.

अंबादास दानवे यांनी भाजप नेत्यांविरोधात ट्वीट करत टीका केली आहे. “बाळासाहेबांना असल्या भाटांची गरज नव्हती. वैचारिक दिवाळखोरी आल्यास असले निर्णय घेतले जातात”, असं त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून टीका केली आहे.

काय होतं ट्वीट?

“वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या दहा मध्ये पाच नावे भाजप नेत्यांची आहेत. तर एकूण यादीत 25 टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने कधीच कमी नव्हते आणि त्यांना असल्या उसन्या भाटांची गरज पडली नाही. ते विचार तुम्हाला कळले नाहीत, म्हणूनच या उसन्या प्रचारकांच्या, उसन्या विचारांच्या आणि भंपक योजनांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत.”

“मोडेन पण वाकणार नाही”

“मोडेन पण वाकणार नाही, हा सुविचार महाराष्ट्राचा स्वभाव दर्शवतो.. यांचा कारभार उलटा आहे.. ‘वाकेन पण मोडणार नाही’!” असं ट्वीट अंबादास दानवे यांनी केलं आहे. (BJP Star Campaigners)

भाजप स्टार प्रचारकांमध्ये नेत्यांचा समावेश

पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसेना नेते गजानन किर्तीकर, शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना नेते आनंद अडसूळ, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या मीना कांबळी, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री दिपक केसरकर, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय राठोड, आमदार भारत गोगावले यांची नावं स्टारप्रचारक (BJP Star Campaigners) यादीमध्ये आहेत.

अंबादास दानवे यांनी आपल्या (x) ट्वीटर अकाऊंटवरून भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीवरून हल्ला चढवला आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होऊ लागली आहे. तसेच भाजपनंतर आता महाविकास आघाडी देखील आपल्या स्टारप्रचारकंमध्ये कोणाचा समावेश करणार हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – BJP Star Campaigners Against Ambadas danve

महत्त्वाच्या बातम्या

निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी

‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!

Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच

समोरची व्यक्ती खोटं बोलतीये की नाही?, ‘या’ 6 टिप्सद्वारे ओळखा

‘विराट काकाच्या मुलीला डेट करायचं’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

 

Join WhatsApp Group

Join Now