महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रीपद नेमकं कुणाला?

On: December 16, 2024 10:45 AM
Shivsena
---Advertisement---

Shivsena Cabinet Ministers | अखेर काल 15 डिसेंबररोजी महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. नागपूरमधील राजभवन येथे हा सोहळा संपन्न झाला. यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. (Shivsena Cabinet Ministers)

आता यात कोणत्या पक्षाला कोणती खाती जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशात शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती जाणार, अशी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

याचबरोबर गृहनिर्माण, उद्योग, पर्यटन ही महत्वाची खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. तसेच आरोग्य, शालेय शिक्षण खातेही शिवसेनेकडेच कायम राहणार असल्याचं म्हटलं जातंय. तसेच पाणीपुरवठा खाते देखील शिवसेनेलाच मिळणार, अशी चर्चा आहे.

तर, ज्या गृह खात्यावरून महायुतीत गेल्या काही दिवसांपासून तिढा निर्माण झाला होता, ते खातं भाजपाच्या वाट्याला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी केली होती. यावरून ते नाराज देखील झाले होते. मात्र, गृहखाते भाजपने स्वतःकडेच ठेवले आहे.

‘ही’ खाती जाणार शिवसेनेच्या वाट्याला-

नगरविकास
गृहनिर्माण
उद्योग
पर्यटन
आरोग्य
शालेय शिक्षण
सार्वजनिक बांधकाम(सा.उपक्रम वगळून )
पाणीपुरवठा
जल संधारण
मराठी भाषा
खणीकर्म (Shivsena Cabinet Ministers)
माजी सैनिक कल्याण

शिवसेनेचे मंत्री-

1. एकनाथ शिंदे
2. गुलाबराव पाटील
3. दादा भूसे
4. संजय राठोड
5. उदय सामंत
6. शंभूराज देसाई
7. संजय शिरसाट
8. प्रताप सरनराईक
9. भरत गोगावले (Shivsena Cabinet Ministers)
10. प्रकाश आबिटकर
11. आशिष जैस्वाल- राज्यमंत्री
12. योगेश कदम- राज्यमंत्री

News Title : Shivsena Cabinet Ministers Full List

महत्वाच्या बातम्या –

कलाविश्वात शोककळा! जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन

आज सोमवारी महादेव कुणावर करणार सुखाचा वर्षाव?, वाचा राशीभविष्य

निक्की आणि अरबाजचे सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…

महाराष्ट्र मंत्रिमंडळात 39 मंत्र्यांनी घेतली शपथ; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

मंत्रिमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी!

Join WhatsApp Group

Join Now