भाजपचा चेहरा बदलला! BMC निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्यावर सोपवली अध्यक्षपदाची जबाबदारी

On: August 25, 2025 11:01 AM
Raosaheb Danve
---Advertisement---

Mumbai BJP new president | मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार अमित साटम (Amit Satam) यांच्याकडे सोपवली आहे. आतापर्यंत ही धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर होती, मात्र आता साटम यांच्याकडे पक्षाने विश्वास दाखवला आहे.

निवडणुकीपूर्वी रणनीतिक पाऊल :

मुंबई महापालिका निवडणुका पुढील तीन ते चार महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठा बदल करत नवा अध्यक्ष जाहीर केला आहे. प्रवीण दरेकर (Pravin darekar) यांचे नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत होते, परंतु शेवटी अमित साटम यांची निवड झाली. मुंबई उपनगरातून राजकारण करणारे साटम हे अभ्यासू व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.

मुंबई महापालिका म्हटलं की गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर आता समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. मराठी मतांची विभागणी होऊ नये म्हणून दोन्ही गट एकत्र येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर भाजपने स्वतःची ताकद आणखी मजबूत करण्यासाठी नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली आहे.

Mumbai BJP new president | प्रवीण दरेकरवरून साटमकडे धुरा :

प्रवीण दरेकर हे मुळात शिवसेना-मनसेमार्गे भाजपमध्ये दाखल झालेले नेते आहेत. त्यांना सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. मात्र भाजपने अखेर स्थानिक पातळीवर मजबूत आधार असलेल्या आणि संघटनात दीर्घकाळ काम केलेल्या अमित साटम यांच्यावर विश्वास दाखवला. साटम यांचा प्रवास नगरसेवक ते आमदार असा झालेला आहे आणि ते तिनदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित साटम (Amit Satam) यांचं कौतुक करताना म्हटलं, “साटम यांनी अभ्यासू व आक्रमक प्रतिमेतून पक्षासाठी काम केलं आहे. संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजप घोडदौड करेल आणि पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असा मला विश्वास आहे.” (Mumbai BJP new president)

फडणवीसांनी आशिष शेलार यांच्याही कामगिरीचं कौतुक केलं आणि 2017 च्या निवडणुकीत त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली.

News Title: BJP Names Amit Satam as New Mumbai President Ahead of BMC Elections

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now