भाजप उमेदवाराचा अर्ज भरायला शिवसेना-राष्ट्रवादीवाले गैरहजर, महायुतीत नव्या वादाची ठिणगी

On: April 27, 2024 12:31 PM
BJP Mumbai Candidate Mihir Kotecha
---Advertisement---

BJP Mumbai Candidate Mihir Kotecha | राज्यातील पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरताना दिसत आहेत. यासाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा (BJP Mumbai Candidate Mihir Kotecha) यांनी पहिल्याच दिवशी अर्ज भरला. शक्तीप्रदर्शन करत मिरवणूक काढली. दरम्यान यावेळी रिपाई (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दिसले नाहीत. यामुळे महायुतीत धुसफूस झाल्याचं समजतंय. (BJP Mumbai Candidate Mihir Kotecha)

मित्र पक्षांची अनुपस्थिती

पाचव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतून सहाही जागा लढणार आहेत. महायुतीतून जाहीर करण्यात आलेल्या दोन जागांवर उत्तर-पूर्व मुंबईची जागा आहे. मुलुंडमधून भाजपकडून विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आलीये. त्यांनी मार्च महिन्यात प्राचारास सुरूवात केली आणि मतदार पिंजून काढायला सुरूवात केलीये. (BJP Mumbai Candidate Mihir Kotecha)

शुक्रवारी रात्रीच्या वेळीस आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा त्यांनी गुरूवारी केला होता. मिहीर कोटेचा यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह रिपाइचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. काही दिवसांआधी कोटेचा यांच्या सभेला शिवसेना प्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो नसल्याने मोठा वाद झाला होता. यामुळेच आता राष्ट्रवादी आणि शिवसेना कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले नसल्याच्या चर्चांना उधाण आलंय. (BJP Mumbai Candidate Mihir Kotecha)

अनुपस्थितीचं कारण आलं समोर

कोटेचा यांना आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनुपस्थितीबद्दल विचारल्यानंतर ते निरूत्तर झाले. तर भाजपमधील सूत्रांनी सर्व मित्र पक्ष हे मुंबईबाहेर प्रचार करत असल्याने ते अर्ज भरण्यासाठी आले नसल्याचं सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत हे प्रचारासाठी बाहेर आहेत. तर उपमुख्यमंत्री हे बारामती मतदारसंघात तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगड मतदारसंघात आहेत, त्यामुळे नेतेमंडळी येऊ शकले नसल्याची माहिती समोर आलीये.

News Title – BJP Mumbai Candidate Mihir Kotecha File Nomination Shvsena NCP Leaders Absents

महत्त्वाच्या बातम्या

“मी पदर पसरते, मला शेवटची…”, रडवेली होऊन पंकजा मुंडे यांची बीडकरांना कळकळीची विनंती

‘मुस्लिम मत हवं, मग मुस्लिम उमेदवार का नाही?’, बड्या नेत्याची कॉँग्रेसवर जाहीर नाराजी

पंजाबच्या तडाखेबाज खेळीपुढे शाहरुखची बोलती बंद; टी20 क्रिकेटमधील सारेच रेकॉर्ड्स झाले चकनाचूर

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील प्रसिद्ध अभिनेता 4 दिवसांपासून बेपत्ता; शेवटच्या पोस्टमुळे खळबळ

मोठी बातमी! राज्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Join WhatsApp Group

Join Now