भाजप नेत्याचे आधी अजित पवारांना टोमणे, नंतर काढला पळ!, बघा नेमकं घडलं काय

On: September 27, 2023 4:00 PM
---Advertisement---

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padakar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. पडळकरांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लबाड लांडगा म्हणत त्यांच्यावर टीका केलेली. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना माफी मागावी लागली. आता पुन्हा एकदा भाजप नेत्याने अजित पवारांवर निशाणा साधला.

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit kamboj) यांनी मुख्यमंत्री पदावरून अजित पवारांना डिवचणारं ट्विट केलं होतं. मात्र मोहित कंबोज यांनी नंतर हे ट्विट डिलीट केलं.

नेमकं काय घडलं?

नुकतंच अजित पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. लालबागचा राजा नवसाला पावतो असं बोललं जातं. अनेकजण लालबागच्या राजाकडे नवस बोलतात. असाच नवस राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी रणजीत नरोटे (Ranjeet Narote) यांनी केला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे, असा मजकूर असलेली एक चिठ्ठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली आहे. यावरून मोहित कंबोज यांनी अजित पवारांना टोमणा मारला. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे.

दरम्यान, अजित पवार आत्तापर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री झालेत. पण अद्याप मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अजित पवारांनी मिळालेली नाही. पण अजित पवार लवकरच मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now