पुण्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्रातून दणका, ‘या’ दोन प्रकरणांमुळे झापलं!

On: February 11, 2024 4:12 PM
---Advertisement---

BJP | राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यभर भाजपचे नेते विविध कार्यक्रम करत असून देशामध्ये विविध शेतकरी, रोजगार तसेच इतर आर्थिक योजना राबवण्यात व्यस्त आहेत. मात्र दुसरीकडे पुणे शहरातील भाजपचे ( BJP) कार्यकर्ते हे उग्र आंदोलन करत आहेत. यामुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. पुण्यातील भाजप कर्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याचे पडसाद आता राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहे.

ललित कला केंद्र प्रकरण

लोकसभा निवडणूक काही महिन्यातच येऊ घातली असून भाजप केंद्रापासून ते प्रदेश पातळीवर आपली काम करत आहे. मात्र दुसरीकडे भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुण्यात ( BJP) घडलेल्या काही घटनांवरून निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. ललित कला केंद्रामध्ये ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि तो प्रयोग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या युवकांनी बंद पाडला. त्यावरून संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून धक्कादायक प्रकार घडला आहे. याचे पडसाद थेट केंद्रामध्ये उमटले आहेत.

निखिल वागळेंवर हल्ला

ललित कला केंद्रामधील घटनेला काही दिवस होताच पुन्हा पुण्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. यावेळी निखिल वागळे यांची गाडी देखील फोडण्यात आली होती. यावेळी निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टीका केल्यानं आम्ही निखिल वागळेंची सभा होऊ देणार नसल्याचं पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी ओपन चँलेंज दिलं होतं. सभेदरम्यान निखिल वागळे जात असताना त्यांच्या चारचाकी गाडीवर हल्ला करून गाडी फोडण्यात आली.

निखिल वागळे यांची गाडी फोडल्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये अनेक भाजप कार्कर्त्यांनी निखिल वागळे यांचा एकेरी नावाचा उल्लेख केला. तसेच त्यांना शिवीगाळ केली होती. भर रस्त्यात हा प्रसंग घडल्याने शहरभरात आणि सोशल मीडियावर याची अधिक चर्चा आहे. यामागे पक्षाचा कोणताही हेतू नसून भाजप आपल्या कार्यकर्त्यांवर नाराज आहे, अशी माहिती समोर आली आहे.

भाजपच्या नेत्यांनी पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना झापलं

हिंदुत्व आणि विचारांच्या लढाईमध्ये धुडगूस घालून सध्या काही करता येणार नाही, अशी ठाम धारणा असून शहरातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेलं आंदोलन हे नेमकं कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आलं आहे. याची विचारणा केंद्र आणि प्रदेश पातळीवर करण्यात येत आहेत. हे प्रकार पुण्यात का घडत आहेत? असाही जाब विचारला असल्याची माहिती आता समोर आली. याचा परिणाम हा आगामी लोकसभा निवडणुकीला होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. यामुळे भाजपच्या नेत्यांना हे महागात पडणार आहे.

सध्या भाजपचे कार्यकर्ते पुण्यामध्ये तेढ निर्माण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे सामाजिक आणि राजकीय परिणामांची जाणीव आहे का?, असा सवाल भाजप नेत्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना केला आहे. या सर्व बाजूंचा विचार करता केंद्रात काम करणाऱ्या भाजपने पुण्यातील पदाधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे, अशी माहिती समोर आली.

News Title – BJP leaders create violence in pune

महत्त्वाच्या बातम्या

सिंहगडावर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, शिवप्रेमी संतापले

मोठी बातमी! भाजप आमदाराच्या मुलाला अटक

“मुख्यमंत्रीसाहेब माझ्या नवऱ्याचं…”, मॉरिसच्या बॉडीगार्डच्या पत्नीचं मोठं वक्तव्य

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

ओवैसींचा लोकसभेत ‘बाबरी मशिद जिंदाबाद’ चा नारा, म्हणतात…

Join WhatsApp Group

Join Now