गुजरातमध्ये भाजपने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले!

On: December 8, 2022 1:53 PM
---Advertisement---

गांधीनगर | गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये भाजपचीच जादू पाहायला मिळाली. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात भाजपने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

यंदा भाजप विक्रमी विजयासह पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. याआधी भाजपने 2002 मध्ये बहुमताचा आकडा पार केला होता. तेव्हा भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या मात्र यावेळी हा आकडा 150 च्या जवळ गेलाय. भाजपची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी आहे.

भाजप गुजरातमध्ये 150 जागांचा टप्पा पार करणार आहे. राज्यातील कोणत्याही पक्षाने जिंकलेल्या सर्वाधिक जागांचा हा विक्रम आहे. म्हणजेच 1985 मध्ये माधवसिंह सोलंकी यांच्या वेळी काँग्रेसला मिळालेल्या 149 जागांचा विक्रम मोडीत निघत आहे. त्यानंतर काँग्रेसला 55.5 टक्के मते मिळाली.

गुजरातमध्ये भाजपने दमदार कामगिरी केलीये. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करू शकतो. मात्र काँग्रेसच्या सत्तेची चावी अपक्षांच्या हातात असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच दुसरीकडे काँग्रेसला घोडेबाजार होण्याची भिती असल्याने काँग्रसने आधीच सावध पवित्रा घेतलाय.

काँग्रेसने सर्व आमदारांना जयपूरला हलवलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपने देखील हलचाली सुरू केल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now