चिकन खात असाल तर लगेच व्हा सावध, ‘या’ जिल्ह्यांत ‘बर्ड फ्लू’ ने वाढवली चिंता

On: March 5, 2025 9:08 AM
Bird Flu Outbreak in Dharashiv Poultry Culling Begins 
---Advertisement---

Bird Flu | राज्यात बर्ड फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, धाराशिव जिल्ह्यात याची एन्ट्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी ढोकी गावात कावळ्यांच्या मृत्यूनंतर आता कोंबड्यांनाही या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पशुसंवर्धन विभाग आणि ग्रामपंचायत अलर्ट मोडवर आहेत. (Bird Flu)

धाराशिव जिल्ह्यात बर्ल्ड फ्लूची एन्ट्री 

भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या कोंबड्यांचे नमुने H5N1 बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे ढोकी गावात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

१० किलोमीटर परिसराला ‘अलर्ट झोन’ घोषित करण्यात आले आहे.  तसेच मास-मटन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी बाधित कोंबड्या नष्ट केल्या जाणार असल्याची माहिती आहे.

बर्ड फ्लू माणसालाही धोका ठरू शकतो

बर्ड फ्लूचा H5N1 विषाणू पक्ष्यांपासून थेट माणसालाही संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिक आणि मांसाहार करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना स्वच्छता पाळण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. (Bird Flu)

धाराशिव जिल्ह्यातील बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, नागरिकांनी घाबरून न जाता मास-मटन पूर्ण शिजवून खावे आणि स्वच्छता राखावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

Title : Bird Flu Outbreak in Dharashiv Poultry Culling Begins 

 

Join WhatsApp Group

Join Now