शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

On: November 6, 2023 8:25 PM
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना स्वत:च्या कर्जत जामखेड मतदारसंघात (karjat jamkhed Election Result) ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

कर्जत तालुक्यामध्ये सहा ग्रामपंचायती तर जामखेड तालुक्यांतील तीन ग्रामपंचायती अशा एकूण 9 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली होती. भाजपचे आमदार राम शिंदे यांच्याकडे 5 जागा तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 जागा आल्या आहेत.

अजित पवार गटाकडे 1 जागा तर स्थानिक आघाडीला जागा 1 जागा मिळाली आहे. तेव्हा कर्जत जामखेड या मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला असून भाजपाचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचं वर्चस्व कायम राहीलंय.

राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकांची धुलवड सुरू आहे. राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर या निवडणूका सर्वांसाठीच प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल समोर येत आहेत. ग्रामपंचायत निकालामध्ये जनतेने भाजप- शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या बाजूने कौल दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी

पवारांच्या काटेवाडीत भाजपचा शिरकाव, पण किंग ठरले अजित पवारच!

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now