टाटांनी करून दाखवलं; एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठी डील?

On: December 13, 2022 2:23 PM
---Advertisement---

मुंबई | एअर इंडिया (Air India) अब्जावधी डॉलर्सच्या सुमारे 500 जेटलाइनर्सची ऑर्डर देण्याच्या अगदी जवळ आहे. ही 500 नवीन विमाने एअरबस आणि बोईंग या दोन्हींकडून येणार आहेत.

एअरलाइन आता टाटा समूहाच्या अंतर्गत मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी पुनरुज्जीवनाकडे वाटचाल करत आहे. आता जेट डील फायनल होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

हा करार मोठ्या विमान ऑर्डरचा भाग असेल. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनी बोईंग आणि एअरबस एसईशी याबाबत बोलणी करत आहे.

तोट्यात चाललेल्या एअर इंडियाने येत्या तीन वर्षांत विमानांच्या ताफ्यात तिप्पट वाढ करण्याची योजना आखली आहे. टाटा समूहाने यावर्षी जानेवारी महिन्यात एअर इंडिया विकत घेतलं होतं.

कमी प्रवासी असणारी 400 तर नॉर्मल विमानं 100 अशी एकूण 500 नवीन विमानं एअर इंडियासाठी मागवण्याची तयारी सुरू केली आहे. याची किंमत साधारण 100 अब्ज डॉलर्स असू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now