बिग बॉसमध्ये निक्की-संग्रामची मैत्री होणार; अरबाजाचं काय?

On: September 19, 2024 4:31 PM
Bigg Boss Marathi
---Advertisement---

Bigg Boss Marathi l बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन प्रचंड गाजत आहे. कारण या घरात पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळी समीकरण आपल्याला पाहायला मिळाली आहेत.बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात घरात दोन टीम पडल्या होत्या. ज्यामध्ये निक्की आणि जान्हवी एकमेकींच्या जिगरी मैत्री बनल्या होत्या. तर आता त्या दोघी एकमेकांच्या विरोधक आहेत. तसेच घरात निक्की आणि अरबाजमध्ये देखील वाद झाला होता, पण आता त्यांची पुन्हा मैत्री झाल्याचं दिसतं आहे.

निक्की आणि संग्राममध्ये मैत्री होणार? :

अशातच बिग बॉस मराठीच्या घरात एका वाइल्ड कार्ड सदस्याच्या एन्ट्रीनंतर पुन्हा एकदा समीकरण बदलण्याची शक्यता आहे. कारण वाईल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुलेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. त्यावेळी पहिल्याच दिवशी संग्रामने अरबाज आणि निक्की या दोघांशी पंगा घेतला.

मात्र यानंतर निक्की आणि अरबाजची संग्रामसोबत देखील बाचाबाची झाली. पण आता यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे. निक्की आणि संग्राममध्ये मैत्रीची झलक दिसत आहे.

Bigg Boss Marathi l अरबाज आणि टीम बीचं नेमकं काय होणार :

अरबाजच्या पाठीमागे निक्की तांबोळी संग्रामसोबत गप्पा मारत असल्याचं एका प्रोमो मध्ये दिसत आहे. कॅप्टन्सी टास्कमध्येही निक्कीने संग्रामला बाय दिला आहे. त्यावेळी निक्की संग्रामला म्हणाली की, ‘तुमच्याकडून मला फ्रेंडली वाईब दिली आहे. जर तुम्ही मला फ्रेंडली वाईब देताय, तर मी उगाचच का तुमच्या वाकड्यात जाऊ, ते ही फक्त अरबाजमुळे?’

आता निक्की आणि संग्रामच्या मैत्रीचं समीकरण पुढे जुळणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याशिवाय या दोघांची मैत्री झाली तर, अरबाज आणि टीम बीचं नेमकं काय होणार हे पाहावं देखील महत्वाचं ठरणार आहे.

News Title : Bigg Boss Marathi Nikki & Sangram Friendship

महत्वाच्या बातम्या –

कंगना पुन्हा नको ते बोलली; भाजप नेत्याने दिला थेट इशारा

विधानसभा निवडणूका ‘या’ तारखे दरम्यान होणार! भाजप ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार

सणासुदीच्या काळात खाद्य तेलाच्या किंमती वाढणार का?

राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now