अभिनेत्री जान्हवी किल्लेकरनं गुपित खोललं, ‘या’ कामासाठी खर्च करते पाण्यासारखा पैसा!

On: March 2, 2025 11:12 AM
Jahnavi Killekar
---Advertisement---

Jahnavi Killekar l ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) आपल्या टास्कमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे ‘टास्क क्वीन’ म्हणून ओळखली जाते. या शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली जान्हवी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सोशल मीडियावरही ती सक्रिय असून, तिचे रील्स लोकप्रिय आहेत. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेत इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील (Patil)यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेद्वारे तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, यावेळी जान्हवी मालिकेतील भूमिकेमुळे नव्हे, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

जान्हवीचा स्किनकेअर आणि महिन्याचा खर्च :

अलीकडेच जान्हवीने तिच्या त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धती आणि महिन्याच्या खर्चाविषयी खुलासा केला. आपल्या स्किनकेअर रूटीनबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, ती त्वचेसाठी विशेष काही करत नाही. ती फक्त फेसवॉश वापरते आणि मॉइश्चरायजरचा वापरही कमी प्रमाणात करते. शूटिंगनंतर घरी आल्यावर ती बेबी ऑइल आणि टिश्यू पेपरच्या मदतीने मेकअप काढून चेहरा स्वच्छ करते.

जान्हवीने पुढे सांगितले की, ती सकाळी ग्लूटाथिओन (glutathione) घेते, जे ती चेहऱ्यावर लावत नाही, पण त्याचे सेवन करते. त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यासाठी ती ग्लूटाथिओनचे सेवन करते. या ग्लूटाथिओनवरच तिचा सर्वाधिक खर्च होतो, असे तिने सांगितले. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, तिचा त्वचेसाठीचा महिन्याचा खर्च जवळपास ३० ते ३५ हजार रुपये इतका आहे.

Jahnavi Killekar l ‘अबोली’ मालिकेतील भूमिकेचा अनुभव :

‘अबोली’ मालिकेतील तिच्या भूमिकेबद्दल बोलताना जान्हवीने सांगितले की, सध्या ती साकारत असलेली इन्स्पेक्टरची भूमिका खूप क्रूर आणि लाचखोर आहे. हे पात्र साकारताना तिला खूप मजा येत आहे, कारण तिला मालिकेतून अरेरावी करण्याची संधी मिळत आहे, जी ती खऱ्या आयुष्यात करू शकत नाही.

या भूमिकेचा आनंद घेत असल्याचे सांगताना जान्हवीने नमूद केले की, याआधी तिने ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत साकारलेली खलनायिकेची भूमिका देखील खूप गाजली होती.

News title : Bigg Boss Fame Jahnavi Killekar’s Monthly Expenses Revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now