Bigg Boss 17 | ‘फालतू कुठला…”, अंकिताचा नवऱ्यासोबत बिग बॉसच्या घरात मोठा राडा

On: January 7, 2024 4:30 PM
Ankita Lokhande and Vicky Jain
---Advertisement---

Bigg Boss 17 | ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तीचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यातील भांडणं काही संपण्याचं नाव घेत नाहीये. दोघेही ‘बिग बॉस 17’ मध्ये सहभागी झाले आहेत. शो ग्रँड फिनालेकडे वाटचाल करत असतानाच यांच्या भांडणाने जोर धरला आहे. अंकिता विकी सोबतच मनारा आणि मुनव्वर यांच्यातही शाब्दिक चकमक दिसून आली.

‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17 ) ने एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे. ज्यामध्ये घरातील प्रत्येक सदस्यांना एक टास्क देण्यात आला आहे. ज्यात कुणातरी एका सदस्याला ‘फालतू’ म्हणायचे आहे. या टास्कमध्ये अंकिताने क्षणाचाही विचार न करता थेट पती विकी जैनला ‘फालतू’ म्हणून घोषित केले.यावरूनच दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाल्याचं दिसून आलं.

अंकिता पती विकीला म्हटली ‘फालतू’-

सलमान खानने बिग बॉस 17 (Bigg Boss 17 ) हाउसमधील सदस्यांना एक टास्क दिला आहे. ज्यामध्ये, प्रत्येक सदस्याला आपल्या मर्जीनुसार दुसऱ्या एका सदस्याचा प्रेमाने अपमान करायचा आहे. मात्र, हा टास्क नंतर मोठ्या भांडणात परावर्तीत झाला.’फालतू’ शब्द लिहिलेल्या बोर्डवर अंकिताने हातोडा मारत ‘विकी फालतू आहे. कशातही आपलं नाक खुपसत असतो.’,असं म्हणत आपला राग व्यक्त केला.

नंतर विकीहि अंकितावर ओरडताना दिसून आला. ‘आपण बिग बॉस चा भाग असलो तरी आपलं एक नातं आहे. तू माझा सन्मान करायला हवा. तू आपलं नातं विसरलीयेस, पण मी नाही विसरलो. तुला इथे नवीन नाती मिळालीयेत.’, असं म्हणत विकीने अंकितावर राग व्यक्त केला.

मनारा आणि मुनव्वर यांच्यातही शाब्दिक चकमक|

अंकिता विकीनंतर मनारा आणि मुनव्वर यांच्यातही जोरदार भांडण दिसून आलं. ‘मनारा एक पतंग आहे. पतंगाच्या डोरशिवाय ती कुठे फिरकतच नाही.’, असं मुनव्वर मनाराला म्हणाला. यानंतर मनाराने रडतच मुनव्वरला प्रतिउत्तर दिले.

दरम्यान, बिग बॉस 17 (Bigg Boss 17 ) च्या घरात अभिषेक कुमारची वापसी झाली आहे. अभिषेकला पुन्हा बघून चाहत्यांनाहि प्रचंड आनंद झाला आहे. मात्र, त्याच्या वापसीने समर्थ आणि ईशाला मात्र धक्का लागल्याचं दिसतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला

MS Dhoni ला हुक्क्याची ‘हुक्की’, चाहते बुचकळ्यात! Video Viral

Ather 450 Apex l Ather ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! प्रति तास 100 किमी धावणार

Ram Mandir | रामललाला ‘मामा’ म्हणणारं गाव अन् प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारे आश्रम

Alia Bhatt चा ‘जलवा’! Animal ची सक्सेस पार्टी; रणबीरही दिसला डॅशिंग

News Title- Bigg Boss 17 A fight between Ankita Lokhande and Vicky Jain

Join WhatsApp Group

Join Now