शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन

On: February 9, 2026 5:49 PM
Sharad Pawar Health Update
---Advertisement---

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. खोकला आणि कफचा त्रास जाणवल्यानंतर त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आज सकाळी बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यात आणण्यात आले. (Sharad Pawar health update)

उपचारांमध्ये बदल करण्यात येणार :

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या असून, उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, अती श्रमामुळे त्यांच्या छातीत कफ साचल्याने हा त्रास झाला आहे.

मात्र सध्या कोणतीही गंभीर बाब नसून, त्यांची स्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तपासण्यांचे अंतिम अहवाल आल्यानंतर आवश्यक असल्यास उपचारांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

Sharad Pawar | रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन :

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. “पवार साहेबांची प्रकृती स्थिर आहे. ते आयसीयूमध्ये नसून खाजगी रूममध्ये दाखल आहेत. थोड्या प्रमाणात कफ आहे, मात्र काळजी करण्याचे काहीही कारण नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar health update)

शरद पवारांवर उपचार करणारे डॉक्टर अभिजीत लोढा यांनी सांगितले की, त्यांची सध्या प्रकृती स्थिर आहे आणि ते सामान्यपणे बोलत आहेत. “त्यांना दोन-तीन दिवसांपासून त्रास जाणवत होता. योग्य त्या तपासण्या करण्यात आल्या असून उपचार सुरू आहेत. सध्या ते आयसीयूमध्ये नसून खाजगी रूममध्ये आहेत. तपासण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी सांगितले.

News Title: Big Update on Sharad Pawar’s Health; Doctors Share Key Information

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now