MLA disqualification | एकनाथ शिंदे जाणार?; तारखेबद्दल मोठी अपडेट समोर

On: December 15, 2023 5:41 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

MLA disqualification | सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर (MLA disqualification) सुनावणी घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. अशात राहुल नार्वेकर यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. मला 2 लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे आले आहेत. ते वाचावे लागतील. तसेच जजमेंट लिहावं लागेल. यासाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून द्या, असं विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अर्जात म्हटलं होतं.

कोर्टाने त्यांची ही मागणी काही मान्य केली. कोर्टाने तीन आठवड्यांची वेळ वाढवून दिली नाही. पण 10 दिवसांची मुदतवाढ दिलीये. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना काही दिलासा मिळाला आहे.

Eknath Shinde | एकनाथ शिंदे जाणार?

निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान होणार आहे. पण ठाकरेंच्या बाजून निकाल लागला तर या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं. त्यामुळे येत्या 10 जानेवारीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार की जाणार? हे कळेल.

MLA disqualification | न्यायालयाने मुदत वाढवली

दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या अर्जात स्पष्ट म्हटलं आहे की, मी निकाल 20 डिसेंबरला राखून ठेवणार आहे. पण मला तीन आठवडे वाढवून द्या. कारण मला जजमेंट लिहावा लागेल. त्यामुळे कोर्टाने सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 जानेवारीपर्यंतचा वेळ देतो. ते राहुल नार्वेकर यांच्या वकिलांनी देखील मान्य केलं, असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की विधानसभा अध्यक्षांचा सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न आहे. पण राहुल नार्वेकर यांची बाजू मांडणारे वकील तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता, असं ते म्हणालेत.

कोर्टाने तीन आठवड्यांचा वेळ दिला नाही. पण दहा दिवसांचा वेळ वाढवून दिला. त्याआधी शिवेसनेचा निर्णय राहुल नार्वेकर यांना निकाल द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Weather Update | सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता

घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Raiचा तो व्हिडीओ तुफान व्हायरल!

Love | प्रेमाचे आहेत ‘इतके’ प्रकार, तुम्हाला माहितीयेत का?

Angioplasty | श्रेयस तळपदेवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया नेमकी आहे तरी काय?

Shreyas Talpadeच्या प्रकृतीबाबत पत्नीने सोशल मीडियावर केला मोठा खुलासा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now