डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, दोन्ही आरोपींना…

On: November 22, 2025 9:32 AM
Dr. Sampada Munde Case
---Advertisement---

Dr. Sampada Munde Case | साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात दिवसेेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये दोन व्यक्तींची नावे स्पष्टपणे नमूद केली होती. यानंतर या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली होती. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास गतीमान झाला असून आता दोन्ही आरोपींविरोधात निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे.

डॉक्टर संपदा मुंडे (Dr. Sampada Munde Case) या फलटणमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आत्महत्येच्या आधी त्यांनी एका हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी रूम बुक केली होती. खोली उपलब्ध असूनही हॉटेलमध्ये जाऊन जीवन संपवल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला. हातावरील सुसाईड नोटमध्ये तिने पीएसआय गोपाळ बदने (gopal badane) याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच प्रशांत बनकर (prashant bankar) याने मानसिक अत्याचार केल्याचा उल्लेखही केला आहे.

पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर पोलीस कोठडीत :

या प्रकरणातील पीएसआय गोपाळ बदने (Gopal badane) घटनेनंतर काही दिवस फरार होता. मात्र त्या दरम्यान तो सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्कात असल्याची माहिती तपासात समोर आली. स्वतः पोलीस अधिकारी असल्याने तपासात सहकार्य करण्यास त्याने नकार दिला असून त्याचा मोबाईलही मुद्दाम लपवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अखेर त्याने पोलिस स्टेशनमध्ये हजर होत आत्मसमर्पण केले.

दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर SIT ने अधिक तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कळंबा कारागृहातून दोघांना SIT टीमने ताब्यात घेऊन फलटण न्यायालयात आणले होते.

Dr. Sampada Munde Case | खासदाराचे नाव आल्यानं राजकीय वातावरण तापलं :

या घटनेनंतर राज्यात राजकीय आरोप-प्रतिआरोपांचा भडिमार सुरू आहे. आत्महत्येच्या या प्रकरणात एका खासदाराचे नाव जोडले गेल्याने वाद आणखी पेटला. विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून संपदा मुंडेंवर (Dr. Sampada Munde Case) प्रचंड दबाव असल्याचा आरोप करण्यात येतोय.

सध्या या प्रकरणाचा तपास SIT कडून सुरू असून मानसिक अत्याचार, बलात्कार, सत्तेचा गैरवापर आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमांखाली तपास चालू आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात वैद्यकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून न्याय मिळावा अशी मागणी जनतेतून आणि वैद्यकीय संघटनांकडून होत आहे.

News Title: Big Update in Dr Sampada Munde Case: Both Accused Sent to Police Custody for SIT Interrogation

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now