‘मी माझं डोकं कापून टाकेन पण…’; राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

On: January 17, 2023 5:10 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. मी शिरच्छेद करेन, पण संघाच्या कार्यालयात जाणार नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

देशातील सर्व संस्थांवर आरएसएस आणि भाजपचं (BJP) नियंत्रण असल्याचा आरोप करत देशातील मीडिया, नोकरशाही, निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेवर दबाव असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत राहुल गांधी (Rahul Gandhi) बोलत होते. यावेळी मी संघाच्या कार्यालयात कधीही जाऊ शकत नाही. तसेच वरुण गांधींची विचारधारा आपण स्वीकारू शकत नाही, असं ते म्हणालेत.

वरुण गांधी (Varun Gandhi) भाजपमध्ये आहेत. त्यांच्या विचारसरणीशी माझी विचारधारा जुळत नाही. माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. वरूणने ती विचारधारा स्वतःची बनवली. मी वरुणला मिठी मारू शकतो पण ती विचारधारा स्वीकारू शकत नाही, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे.

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारची राहुल गांधींनी खिल्ली उडवली. पंजाबचा कारभार दिल्लीतून नव्हे तर पंजाबमधून चालवला पाहिजे, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now