उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आणखी एक नेता अडचणीत

On: September 15, 2023 3:56 PM
---Advertisement---

मुंबई | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पुन्हा मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत सापडलाय. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबत इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीसह इतरांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. जोगेश्वरीतील भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी वायकर यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. त्यामुळे वायकर हायकोर्टात गेले होते. पण काही त्यांना दिलासा मिळाला नाही.

लहान मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर हॉटेलची बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. 11मार्च 2023 रोजी सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला होता. त्यानंतर महापालिकेने दोन महिन्यापूर्वी वायकरांना दिलेली परवानगी रद्द केली होती.

दरम्यान, सुरज चव्हाण आणि नंतर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणात या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असं असताना ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्यावर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now