मनोज जरांगेंना मोठा धक्का; अडचणीत आणखी वाढ

On: March 17, 2024 12:39 PM
Manoj Jarange Patil
---Advertisement---

मुंबई | मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्याकडून मागील काही दिवसांपासून राज्याचा दौरा केला जात आहे. याच दौऱ्याच्या निमित्ताने जरांगे मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात होते. या काळात त्यांनी मराठा समाजाच्या बैठका घेत काही ठिकाणी सभा देखील घेतल्या. दरम्या, यावरून पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बीड (Beed) जिल्ह्यात जरांगे यांच्यावर दोन दिवसांत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मागील दोन दिवसात बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण, तसेच अंबाजोगाई शहर, नेकनूर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल पाच गुन्हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विरुद्ध दाखल झाले आहेत.

बैठकांमध्ये जरांगे-पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणे, प्रक्षोभक भाषण करणे, खोटी माहिती प्रसारीत केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसांत अशी पाच गुन्हे दाखल झाले आहेत. याच अनुषंगाने जरांगे-पाटील यांना नोटीसही पाठवण्यात आलीये.

अशोक चव्हाणांनी घेतली जरांगेंची भेट

अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणातील मुद्द्यांवर चर्चा झाली. जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

सरकार म्हणून नव्हे तर मराठा समाजाचा भाग म्हणून भेटायला आल्याने अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. जरांगे पाटील यांच्या समाजाच्या मागण्या आहेत आणि रास्त आहे त्यामध्ये काही तोडगा निघाला पाहिजे, आणि ही माझी भूमिका आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, फोटो समोर

‘हा’ बडा नेता मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला!

मराठी इंडस्ट्री का मागे आहे? गश्मीर महाजनी म्हणाला…

“वयाने लहान मुलाशी लग्न केलं तरी..”, बबिताजीची पोस्ट नेमकी कुणासाठी?

क्रिकेटप्रेमींना धक्का, निवडणुकांमुळे आयपीएलमध्ये मोठे बदल?,मोठी माहिती समोर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now