‘त्या भेटीत अनेक…’; अपक्ष आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

On: November 11, 2023 5:09 PM
---Advertisement---

मुंबई | सध्या निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबद्दल सुनावणी सुरु आहे. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) काल दिल्लीला गेल्याने विविध चर्चा सुरु आहेत.

अमित शहा (Amit Shaha) यांच्या बरोबरच्या भेटीत मराठा आरक्षण आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली. जवळपास 45 मिनिट दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित होते. आता या भेटीवर अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राज्याच्या विकासासाठी पवार साहेब मोदीजींना पाठिंबा देतील आणि राज्य सरकार मजबूत करतील असं चित्र सध्या दिसत आहे. निवडणुकांपूर्वी अनेक घडामोडी घडणार आहेत, असा दावा त्यांनी केलाय.

शरद पवार देखील यामुळे तयार झाले असतील असं मला वाटते. अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीत भेटीत अनेक रहस्य दडलेले आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला भाजपसोबत दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा आपल्याला मोदीजींसोबत दिसतील, असं राणा म्हणालेत.

अजित पवार सरकारमध्ये नाराज असल्याची देखील चर्चा होती. पण काल अमित शहा यांच्याबरोबर भेटीचे जे फोटो समोर आलेत, त्यावरुन तरी असं वाटत नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

पोलीस कोठडीत ललित पाटील याची प्रकृती बिघडली!

“उद्धव ठाकरेंना अडवताय, तुमची लायकी काय?”

पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर… काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप 

शरद पवारांनी उपसलं हुमकी अस्त्र, अजित पवारांचं आता काय होणार?

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now