‘मी पळालो नाही, मला पळवलं गेलं’; ललित पाटीलचा मोठा खुलासा

On: October 18, 2023 4:10 PM
---Advertisement---

मुंबई | ड्रग माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) अटक करण्यात आली आहे. तो सध्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ताब्यात आहे. ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं असून त्यानंतर ललित पाटील याला अंधेरी न्यायालयात हजर केलं जाईल. यावेळी तपासणीसाठी जात असताना ललित पाटीलने माध्यमांसमोर मोठा खुलासा केलाय.

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं आहे. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, हे मी सगळं सांगेन, असे ललित पाटीलने म्हटलं. त्यानंतर पोलिसांनी ललित पाटीलला लगेच रुग्णालयात नेलं. ललित पाटीलच्या या वक्तव्यामुळे नव्या वादामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

ललित पाटील याला रुग्णालयातून पळवण्यात कोणाचा हात होता? त्याला राजकीय संरक्षण होते का? याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

दरम्यान, याप्रकरणानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ माजली होती. त्यासाठी कारणीभूत ठरलं ते, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यासोबतच अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. तसेच ललित पाटीलने देखील या प्रकरणात कोणाकोणाचा हात होता हे सगळं सांगणार असल्याचं म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now