‘नोटांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप’; माजी गव्हर्नर आणि मोदींबद्दल मोठा खुलासा

On: September 25, 2023 6:45 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी त्यांच्या ‘वी अलॉस मेक पॉलिसी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत(Narendra Modi) मोठा खुलासा केला आहे. सुभाष यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की 2018 मध्ये एका बैठकीत पीएम मोदींनी संयम गमवून आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल (Urjit Patel)यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हटलं होतं.

द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने सुभाष गर्ग यांच्या पुस्तकाचा एक भाग प्रकाशित केला आहे. हे पुस्तक ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होणार आहे.

सुभाष गर्ग यांनी लिहिलं आहे की उर्जित पटेल, तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली आणि प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि इतर अधिकाऱ्यांचं दोन तास सादरीकरण ऐकून आणि पाहिल्यानंतर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं होतं. 2 तासांनंतर त्यांना वाटलं की कोणताही उपाय निघत नाही. या बैठकीत तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल, अतिरिक्त प्रधान सचिव पीके मिश्रा आणि आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नरही उपस्थित होते.

उर्जित पटेल यांनी काही सूचना केल्या होत्या. या सर्व सूचना सरकारसाठी होत्या, आरबीआयसाठी नाही. कारण त्यांच्या मते आरबीआय आधीच पावले उचलत होती. त्यांचं आकलन असं होतं की आरबीआय त्या स्थितीत नाही आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे. समस्या सोडवण्यासाठी आणि सरकारमधील मतभेद मिटवण्यासाठी काहीही करू नका. यामुळे पंतप्रधान नाराज झाले. मी त्यांना पहिल्यांदाच असे पाहिलं. त्यांनी उर्जित पटेल यांची तुलना पैशाच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या सापाशी केली. कारण त्यांनी आरबीआयचा राखीव पैसा सरकारला द्यायचा नव्हता.

उर्जित पटेल यांची सप्टेंबर 2016 मध्ये आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोनच महिन्यात केंद्र सरकारने नोटाबंदी केली होती. पुढे धोरणांमधील मतभेदांमुळे त्यांचे सरकारशी संबंध चांगले राहिले नाहीत. 10 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव RBI गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता.

सुभाषचंद्र गर्ग यांनी त्यांच्या पुस्तकात उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचं प्रकरणही सांगितलं आहे. त्यात त्यांना कोणत्या परिस्थितीमुळे राजीनामा द्यावा लागला हे स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now