Konkana Sen | ‘मला सिगारेटचं…’; कोंकणा सेनने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

On: January 10, 2024 10:23 PM
Konkana Sen
---Advertisement---

Konkana Sen | मेट्रो, आजा नचले, तलवार, लाइफ इन मेट्रो, लिपस्टिक अंडर माय बुरखा अशा चित्रपटात झळकलेली अभिनेत्री कोंकणा सेन (Konkana Sen) सध्या ‘वेक अप सिड 2’ च्या सिक्वेलमुळे चर्चेत आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि तीचा ‘वेक अप सिड’ हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. या दोघांची जोडी तब्बल 14 वर्षांनी एका जाहिरातीत दिसून आली आहे. त्यामुळे चाहत्यांकडून ‘वेक अप सिड 2’ चा सिक्वेल येणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.

कोंकना ‘वेक अप सिड’ मुळे चर्चेत असतानाच तिने केलेल्या एका मोठ्या खुलास्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोंकणाने आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. चित्रपट सृष्टीत अनेक मोठ्या चित्रपटाचा भाग असतानाही एका सवयीमुळे तिला फार त्रास झाल्याचे तीने सांगितले.

konkna sen ला आहे स्मोकिंगची प्रचंड सवय

कोंकणाने मनमोकळेपणाने या गोष्टीचा खुलासा केला. “मला स्मोकिंग करायची वाईट सवय आहे आणि आता मला ही सवय मोडायची आहे. हळूहळू माझी हि सवय कमी होतीये. पण, आता मला पूर्णपणे माझी स्मोकिंगची सवय मोडायची आहे.”, असे कोंकणा(Konkana Sen)म्हणाली.

पुढे कोंकणाने आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा उल्लेख केला. “माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, मला 3 महिने बेड रेस्ट करावा लागला होता. ते तीन महिने माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण दिवस होते. मात्र, आता मला ते तीन महिने संपवायचे आहेत.”, असा खुलासा कोंकणाने केला.

आयुष्यात प्रसिद्धी, पैसा सर्व काही असूनही फक्त स्मोकिंगच्या सवयीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असल्याचे कोंकणाने(Konkana Sen) सांगितले. मात्र, आता तीला ही सवय मोडायची आहे. आयुष्यात पुन्हा बेडवर पडून राहायचे नसल्याने आता ही सवय सोडायची असल्याचे ती सांगते.

‘किलर सूप’ मध्ये झळकणार konkna sen

कोंकणा सेन लवकरच ‘किलर सूप’ या चित्रपटात झळकणार आहे. नेटफ्लिक्स हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. तिच्यासोबत अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तसेच, ‘वेक अप सिड’ या चित्रपटातही दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘वेक अप सिड’ (Wake Up Sid) या चित्रपटाचा सिक्वेल येणार की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र रणबीर आणि कोंकणाने (Konkana Sen)एका मोबाईलची जाहिरात केली आहे. सोशल मीडियावर हाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. रणबीर-कोंकणाशिवाय शिखा तलसानिया आणि नमित दास देखील जाहिरातीत दिसत आहेत. हे दोघेही या चित्रपटाचा एक भाग होते. सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे चाहत्यांकडून ‘वेक अप सिड’चा सीक्वल येणार असल्याचा दावा केला जात आहे.

News Title :  Big reveal of Konkana Sen

महत्त्वाच्या बातम्या- 

Shiv Sena MLA Disqualification | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ठाकरेंना पहिला धक्का!

Shiv Sena MLA Disqualification LIVE | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल वाचा जसाच्या तसा

Shiv Sena MLA Disqualification Case | निकाल विरोधात लागला तरी ठाकरेंचा प्लॅन बी तयार, अशी असणार योजना

Rashmi Shukla | आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी मोठी बातमी समोर!

Shiv Sena MLA Disqualification Case | एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं लागणार निकाल?, सर्वात मोठी माहिती आली समोर

Join WhatsApp Group

Join Now