Eknath Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटातील खासदारांना आपल्या गटात आणण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
ठाकरे गटातील खासदारांवर शिंदेंची नजर :
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण स्थिर होत असल्याचं चित्र होतं. मात्र आता पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळू लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे लवकरच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील निम्म्याहून अधिक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या खासदारांपैकी चार खासदार पक्षांतरासाठी सकारात्मक असल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Eknath Shinde | दिल्ली भेटीत झाली रणनीतीवर चर्चा? :
अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. अधिकृतपणे या बैठकीत राज्यातील विकासकामांबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं असलं तरी राजकीय रणनीतीवरही सविस्तर चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी संपर्कात असलेल्या खासदारांची यादी पक्षश्रेष्ठींना सादर केल्याचं सांगितलं जात आहे. संभाव्य पक्षांतर करताना कोणतेही कायदेशीर अडथळे येऊ नयेत यासाठीही कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच योग्य वेळ साधून ठाकरे गटाला धक्का देण्याची रणनीती आखली जात असल्याचंही बोललं जात आहे.






