तरुणांनो सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ जिल्ह्यात पोलिस भरती

On: October 31, 2025 10:15 AM
Pune News
---Advertisement---

Police Bharti 2025 | राज्यातील तरुणांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. अनेक तरुणांचे पोलिस होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती (Police Bharti 2025) प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. या भरतीमुळे हजारो तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे.

रत्नागिरी आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात पदे उपलब्ध झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 108 पोलिस शिपाई पदे तर जळगाव जिल्ह्यात तब्बल 171 पदांची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता तातडीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. (Maharashtra Police Recruitment)

अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेची पद्धत :

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना सर्वप्रथम शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. ही चाचणी एकूण 50 गुणांची असेल. शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नंतर 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल. दोन्ही टप्प्यात उत्तीर्ण झालेल्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

रत्नागिरी पोलिस अधीक्षक आस्थापन 2024-25 अंतर्गत या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. जळगाव पोलिस अधीक्षक आस्थापनात देखील या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Police Bharti 2025 | आवश्यक शैक्षणिक पात्रता व कागदपत्रे :

या पोलिस भरतीसाठी दहावी, बारावी किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी गुणपत्रक आवश्यक आहे. उमेदवाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, टीसी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन-क्रिमीलेअर सर्टिफिकेट, रहिवासी आणि बोनाफाईड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

तसेच जर उमेदवार खेळाडू असेल तर त्याचे खेळाडू प्रमाणपत्र सादर करावे लागेल. वडील पोलिस सेवेत असतील तर त्याचेही प्रमाणपत्र आवश्यक आहे. महिलांसाठी भरतीत 30 टक्के आरक्षण दिले गेले असून त्या प्रमाणे अर्ज स्वीकारले जातील.

News Title: Big Police Recruitment 2025 in Maharashtra: Apply Now for Constable Posts in Ratnagiri and Jalgaon Districts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now