मुंबई | सध्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतीये. राज्यपाल (Maharashtra Govrerner) पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली.
या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिल्याची बातमी समोर आली आहे.
माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- “दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणाऱ्या अवलादींना गाडून…”
- “गद्दारांना आणि गद्दारांच्या राजकीय बापांना आव्हान आहे, निवडणूक घ्या”
- बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा काय होता?
- “चमत्कार करुन जोशीमठची दुभंगलेली जमीन जोडून दाखवा”
- उद्धव ठाकरेंनी सांगितलं प्रकाश आंबेडकरांबरोबरच्या युतीचं कारण






