Disha Salian | दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठी बातमी समोर!

On: December 12, 2023 12:25 PM
Disha Salian
---Advertisement---

मुंबई | सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian) मृत्यूप्रकरणी आज एसआयटी स्थापन केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मुंबई पोलिसांनी लेखी स्वरुपात आदेश देण्यात आले आहेत.

Disha Salian | आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ

या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. 8 जूनच्या रात्री दिशा सालियानने (Disha Salian) 40 फोन कॉल केलेला तो नंबर कुणाचा, या मथळ्याखाली तपास सुरू होणार आहे. त्यामुळे मंत्री आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एसआयटी स्थापन होऊन आजच नोटिफिकेशन जारी होणार असल्याचं कळतंय. राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले असून विवेक फनसळकरांची संयुक्त आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे.

दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी अनेक आमदारांनी केली आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात SIT चौकशीचे आदेश दिले होते. आता एसआयटी गठीत केली जाणार असून चौकशीला सुरुवात होणार आहे.

Disha Salian कोण होती?

कर्नाटकच्या उडुप्पी याठिकाणी जन्मलेली दिशा सालियान ही सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंह राजपूत, भारती सिंह यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं होतं.

ती बऱ्याच जाहिरातींच्या एजन्सीसोबतही जोडली गेली होती. टीव्ही अभिनेता रोहन रॉयला ती डेट करत होती आणि मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Maratha Reservation | मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाचा तडकाफडकी राजानीमा

Share Market | ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

Kalicharan Maharaj | ‘राममंदिर उद्ध्वस्त…’; कालिचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

Manoj Jarange | मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली

Stop Clock Rule | आता गोलंदाजांचं काही खरं नाही, आयसीसीनं आणला नवा नियम

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now