राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतून मोठी बातमी समोर!

On: November 18, 2023 5:25 PM
---Advertisement---

मुंबई | मराठा समाज मागास आहे, हे सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोगाने कामकाजाला सुरुवात केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतील आतली बातमी आता समोर आली आहे.

राज्य मागासवर्ग आयोग आता मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या हालचाली करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण तपासलं जाणार आहे. तसेच शैक्षणिक मागासलेपणाची वास्तविक टक्केवारीसुद्धा या सर्व अभ्यासातून तपासली जाईल.

शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण तपासलं जाणार आहे. त्याची नेमकी टक्केवारी किती आहे आणि खुल्या प्रवर्गाची टक्केवारी किती आहे ते तपासलं जाणार आहे. राज्य मागासवर्ग आयोग बापट समिती, भोसले समिती आणि शिंदे समितीच्या अहवालाचा तुलनात्मक अभ्यास करणार आहे.

आयोग काय-काय करणार? 

आतापर्यंत नेमण्यात आलेल्या सर्व समित्यांचा कामाचा आणि त्यांच्या अहवालाचा अभ्यास मागासवर्ग आयोग करणार आहे. सर्व समित्यांचा अभ्यास करुन त्रुटी सुद्धा शोधल्या जाणार आहेत, अशी माहिती समोर आलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडर झाला स्वस्त

पुणेकरांनो आताच व्हा सावध; बाहेर पडताना काळजी घ्या

मोठी बातमी! 31 डिसेंबरपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now