पुणे | पुणेकरांसाठी (Pune) आनंदाची आणि अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. 1 मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मुख्य पुलाचं उद्घाटन होणार आहे.
चांदणी चौकातील जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. 15 ते 20 एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचं काम सुरू होणार आहे. चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.
दोन दिवस चांदणी चौकातील (Chandani Chowk) वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्विस रोडची कामं पूर्ण झाली आहेत. 10 एप्रिलला सुरू चांदणी चौकातील सर्विस रोडहोणार होणार आहे.
दरम्यान, चांदणी चौकातील वाहतूक या दोन पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्या अनुषंगाने लवकरच परिपत्रक शासनाकडून जाहीर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-






