मोठी बातमी! अखेर इतक्या वर्षानंतर आसाराम बापूला जन्मठेपची शिक्षा

On: January 31, 2023 4:15 PM
---Advertisement---

नवी दिल्ली| अनुयायी तरूणीवर सुरतमधील आश्रमात बलात्कार केल्याप्रकरणी गांधीनगर न्यायालयानं आसाराम बापूला(Asaram Bapu) सोमवारी दोषी ठरवले होते. याच प्रकरणी आसारामला मंगळवारी शिक्षा सुनावण्यात येणार होती.

आसराम बापू सध्या जोधपूर येथील तुरूंगात असून त्यांना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आसराम बापूंच्या दोन मुली, पत्नी आणि चार महिला अनुयायींना दोषी ठरवण्यात आलं होतं. परंतु न्यायालयानं यांची निर्दोष सुटका केली आहे.

जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच आसारामला २३ हजार रूपयांचा दंडदेखील दिला आहे. तसेच पीडितेला ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयानं दिला आहे

दरम्यान, 2013 मध्ये आसराम बापूवर आणि त्याच्या मुलावर दोन सख्या बहिणींनी तक्रार दाखल केली होती. यातील मोठ्या बहिणीवर आसराम बापूनं तर लहान बहिणीवर त्याच्या मुलानं बलात्कार केला होता.

गतवर्षी म्हातारपण आणि आजारपणामुळं आसारामला जामीन दिला पाहीजे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now