मुंबई | नोव्हेंबर म्हटलं की हिवाळा सुरु व्हायची चाहूल लागते. मात्र सध्या तरी राज्यात कुठेही पाहिजे तसा हिवाळा सुरु झालेली नाही. मात्र काही शहरांमध्ये थंडी वाढू लागली आहे. तर पहाटेपासून थंडी आणि दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत आहे.
दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना महत्त्वाचा इशाारा दिलाय. ऐन दिवाळीमध्ये तुम्हाला रेन काॅट आणि छत्री बाहेर घेऊन पडावं लागेल. राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण किनारपट्टी भागात सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्याचबरोबर, राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अचानक बद्दलेल्या हवामानामुळे मात्र शेतकऱ्यांचं टेनश्न वाढलं आहे. ऐन रब्बी हंगामामध्ये राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पीकाची काळजी घेण्याची माहिती हवामान विभागाने सांगितलं आहे.
तर महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमधील मलप्पुरम, इडुक्की आणि पठानमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच 6 नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!
याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!
बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये…
‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?






