मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर!

On: October 30, 2023 3:18 PM
---Advertisement---

जालना | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी गेले पाच सहा दिवस अन्न पाण्याला शिवलं देखील नाही. त्यांना अनेक नेते मंडळी यांनी विनंती देखील केली पण तरी सुद्धा जरांगे माघार घेत नसल्याचं दिसत आहे.

आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 6 वा दिवस आहे. त्यांनी गेले काही दिवस खाल्ल नसल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे. स्टेजवर देखील जरांगे जास्तवेळ बसू शक्त नाही त्यामुळे ते झोपूणच इत्तरांशी संवाद साधतात. दरम्यान जरांगे यांच्या प्रकृतीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

जरांगे पाटील स्टेजवर उभ राहताच ते खाली कोसळले. ग्रामस्थ मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचं आवाहन करतायत. मात्र जरांगे पाटील पाण्याला हात लावत नव्हते. त्यावेळी एक मुलगी त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन आली, पण मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घेतलं नाही. वैद्यकीय उपचार न घेण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.

समाजाचं तुम्हाला ऐकावं लागेल असा आवाज गर्दीमधून येत आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी समाजाचं ऐकत पाण्याचे चार पाच घोट घेतले. दरम्यान काही वेळानंतर जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळेस ते काय म्हणतात याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now