संजय राऊत यांच्या पत्रानंतर सरकारचा मोठा निर्णय!

On: February 22, 2023 5:27 PM
---Advertisement---

मुंबई | निव़डणूक आयोगाच्या निर्णयामुळं सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात आरोप-प्रत्यारोपांनी चागंलाच जोर धरला आहे. यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होतं. त्याच पत्रामुळं आता वातावरण तापल्याचं दिसत होतं. याचपार्श्वभूमी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. याचसंबधी राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात राऊतांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना मारण्याचा कट केला जात असून तो शिंदे गटातील नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केला आहे, असा आरोप त्यांनी या पत्रात केला होता.

राऊतांच्या या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांच्या चौकशीसाठी नाशिकमध्ये ठाणे पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. तसेच या पत्रानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे.

मी हे पत्र सुरक्षेसाठी दिलं नव्हतं असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. दरम्यान, राऊतांनी केलेल्या या आरोपामुळं अनेक लोक आक्रमक झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. राऊतांनी पत्रात दिल्याप्रमाणे त्यांची सुपारी राजा ठाकूर (Raja Thakur) याला श्रीकांत शिंदेनी दिली असल्याचा उल्लेख केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now