MHADA | मोठी बातमी! म्हाडाच्या घराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

On: December 15, 2023 6:07 PM
MHADA
---Advertisement---

मुंबई | म्हाडाच्या (MHADA) 56 वसाहतींच्या सेवा शुल्काबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत घोषणा केली आहे.

MHADA | मुंबईकरांना मोठा दिलासा

56 वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे तब्बल 384 कोटींचा भुर्दंड माफ होणार आहे. मुंबईतील सर्व आमदारांनी म्हाडाच्या (MHADA) 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ करावं याबाबतची मागणी केली होती. विशेषत आमदार प्रविण दरेकर यांनी मागणी केली होती.

MHADA  | 384 कोटीचा भुर्दंड माफ

मुंबईतील म्हाडाच्या वसाहतीत रहाणाऱ्या रहिवाशांकडून हा कर वसुल केला जात होता. हा कर पालिका आणि बेस्ट मिळत होता. हा सेवा शुल्क कर पन्नास टक्के माफ करण्यात आला होता.

मुंबईकरांना या कराचा भुर्दंड सहन करावा लागत होता. या प्रकरणी भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांनी मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे म्हाडा वसाहतीतील रहिवाशांचा 384 कोटीचा भुर्दंड माफ केला जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये आम्ही म्हाडाच्या (MHADA) 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

MLA disqualification | एकनाथ शिंदे जाणार?; तारखेबद्दल मोठी अपडेट समोर

Weather Update | सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता

घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Raiचा तो व्हिडीओ तुफान व्हायरल!

Love | प्रेमाचे आहेत ‘इतके’ प्रकार, तुम्हाला माहितीयेत का?

Angioplasty | श्रेयस तळपदेवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया नेमकी आहे तरी काय?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now