मुंबई | एसटी (ST) कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज (Good News) समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारने दिलासा दिला आहे. थकलेला पगार हा आजच होणार आहे.
300 कोटींचा निधी रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम आजच महामंडळाला देण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील.
गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तुटवट्यामुळे वेतन वेळेत होत नाही. ते 7 ते 10 या तारखेपर्यंत पगार देण्याची हमी राज्य शासनाने संपाच्या दरम्यान न्यायालयात दिली होती.
कोर्टात सांगितल्याप्रमाणे सरकार वागत नसल्यामुळे, या संदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस यांनी घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या-






