स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का!

On: August 9, 2025 10:53 AM
Haji Saleen Qureshi Attack
---Advertisement---

Eknath Shinde | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला गळती लागल्याचे चित्र होते, पण आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाही सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाला मोठे खिंडार पडले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी हे चांगले संकेत नसल्याचे मानले जात आहे.

एकनाथ शिंदेंना धक्का

मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे सोलापुरातील नेते शिवाजी सावंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू झाले आहे. माढा तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी सांगितले की, “संजय कोकाटे आणि पंढरपूरच्या महेश साठे या दोघांमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना फुटली. या दोघांच्या कुरघोडीमुळे आम्ही राजीनामे देत आहोत.”

मुन्ना साठे म्हणाले की, “मागील दोन महिन्यांपासून चुकीच्या लोकांना या दोघांनी पदे वाटल्यामुळे जिल्ह्यात आता ही सेनेची अवस्था झाली आहे. पक्षाच्या निरीक्षकांसह वरिष्ठांना देखील या मंडळींनी चुकीची माहिती दिल्यामुळे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.”

राजीनामा सत्र सुरूच

मुन्ना साठे यांच्यासह १६ पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी ३१ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

सावंत यांच्या राजीनाम्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामे देत आहेत. त्यातच आता माढा तालुक्यातील तालुका प्रमुख मुन्ना साठेसह १६ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

आगामी दोन-तीन महिन्यांत जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला वेळीच याची दखल घेऊन पावले उचलावी लागतील.

News Title: Big Blow to Shiv Sena Shinde Group Before Local Body Elections

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now