माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका!

On: November 21, 2023 11:50 AM
---Advertisement---

मुंबई | अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. 2021 मधील अहवाल माध्यमांमध्ये लिक प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

मुंबईते तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा हा आरोप होता.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजा हिने लीक केल्याचा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असं म्हटलं असल्याचा दावा करण्यात आला.

या प्रकरणात सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेत तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील डगा यांना अटकही झाली होती.  या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निर्देशावर सीबीआय करत होती.

अहवाल मिळवण्यासाठी सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनी कथित लाच दिल्याचा ठपका या आरोपपत्रात केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठा गौप्यस्फोट: ललित पाटील प्रकरणात ‘या’ बड्या नेत्यांची नावं 

मराठा आरक्षण कोणी लपवून ठेवलं?, जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 

भंडाऱ्यात अजित पवार यांच्या कार्यक्रमावेळी घडला धक्कादायक प्रकार

विश्वचषक सामन्याआधीच अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली…

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now