भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबाला

On: November 6, 2023 11:33 AM
BJP
---Advertisement---

सातारा | साताऱ्यात महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचं साताऱ्यात वर्चस्व पाहायला मिळतंय. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा साताऱ्यात बोलबाला कायम आहे.

कराडच्या टेंभु ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आहे. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. येवती, शेळकेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रीय काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक उदयसिंह पाटील उंडाळकर यांचं पॅनेल विजयी झालं आहे.

कराड तालुक्यातील हेळगाव ग्रामपंचायतीचा निकालही समोर आला आहे. आमदार बाळासाहेब पाटील शरद पवार गट राष्ट्रवादीने जिंकली आहे. 7/3 अशा फरकाने पाटील यांचा पॅनेल विजयी झाला आहे.

कराड कांबेरीवाडी ग्रामपंचायत आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. कराड बानुगडेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचा बोलबाला आहे. तर कराडमध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय.

राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. राज्यभरात आज दिवसभरात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. इतकंच नाही तर शंभरहून अधिक सरपंचपदाच्या रिक्त पदांसाठी मतदान पूर्ण झालं आहे.

2 हजार 68 ग्रामपंचायतींमधील 2 हजार 950 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागेसाठी पोट निवडणुकसुद्धा घेण्यात आली. राज्यातील काही मतदान केंद्र वगळता इतर ठिकाणी शांततेच मतदानाची प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडली.

राज्यातील आज झालेल्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत संध्याकाळपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार साधारण सरासरी 74 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली. आता आपल्या ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!

याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!

बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये…

‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now