‘तुम्ही आमच्या समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारताय’; भुजबळांचं जरांगेंना उत्तर

On: February 6, 2024 3:21 PM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

नाशिक | छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सरपंच होणार नाहीत, असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. यावर मंत्री छगन भुजबळांनी पलटवार केला आहे. जरांगेंना सांगा तुम्ही आधी ग्रामपंचायतीला निवडून या, तुम्ही आमच्या धनगर, नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम करत आहात. ते आधी थांबवा, असं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना दिलं आहे.

छगन भुजबळांचं जरांगेंना उत्तर

आम्ही ज्या रॅली घेतो त्यात सर्व पक्षांचे आमदार असतात. सर्व पक्षीय ओबीसी नेते रॅलीत एकत्र येतायेत. अशा वेळी जर नव्या पक्षाचा विचार केला तर इतर सर्व मंडळी काय करणार? मतप्रवाह वेगवेगळे वाहतील. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यावर लक्ष द्यायला हवं, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे

ओबीसी नेत्यांची कशासाठी बैठक वगैरे होती मला माहित नव्हतं. त्यांनी पक्ष काढायचा वगैरे निर्णय घेतलाय. माझी भूमीका ही आहे की, ओबीसी आरक्षण कसं वाचवायचं यावर फोकस आहे. कोर्टाची लढाई सुरु आहे, यावर फोकस करणं आवश्यक आहे, असं भुजबळ म्हणालेत.

नाभिक समाजावर छगन भुजबळ म्हणाले की, एका गावात एका नाभिक व्यक्तीच्या दुकानावर बहिष्कार टाकावा अशी पोस्ट आली. त्यामुळे त्या गावातील नाभिकांनी ठरवलं की, सर्व नाभिकांनी मिळून समोरच्यांवर बहिष्कार टाकला तर ते काय करतील?, असं भुजबळ म्हणालेत.

एकमेकांचे केस कापतील का? म्हणून नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो. नाभिक समाजाच्या संघटनांनी मला काय सांगायंय हे स्पष्ट केलं. नाभिक समाजाचे महामंडळ माझ्या बाजूनं उभे राहतील, असं ते म्हणालेत.

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे काय म्हणाले?

दरम्यान, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायच आहे. मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत, तर दुरुस्ती 2001 च्या कायद्यात झाली पाहिजे, तर त्या कायद्याला चॅलेंज होणार नाही. आपल चॅलेंज झालं, तर ओबीसींच सगळ आरक्षण उडेल, असं जरांगेंनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी; ‘या’ शेतीसाठी सरकार देतंय अनुदान

मोठी गुड न्यूज; सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

“मिर्झापुर सीरिज पाहिलीत तर तुम्हाला उलटी येईल”

लेकापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडचणीत; ‘त्या’ फोटोने नवा वाद

टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now