Manoj Jarange | सरकारचा जीआर घेऊन जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या मंगेश चिवटेंना भोवळ

On: January 26, 2024 2:52 PM
Mangesh Chivte
---Advertisement---

मुंबई | मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. सीएसएमटीसमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या मंगेश चिवटे यांना भोवळ आली आहे. मंगेश चिवटे हे सरकारच्या शिष्टमंडळाती प्रतिनिधी आहेत.

Manoj Jarange | मगेश चिवटेंना भोवळ

सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून तोडगा निघतो का? पाहिलं जात आहे. मात्र जरांगे मागण्यांवर ठाम असल्याने सरकार आता यावर कसा तोडगा काढणार? हे पाहण म्हत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकारकडून त्यांच्यासोबत मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत.पण अद्यापपर्यंत त्यात यश आलेलं नाही.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. सरकारच्या शिष्टमंडळाने आज जरांगे यांच्याशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघाले होते. मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरु करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. आता आरक्षणाचा गुलाल घेऊनच मुंबई सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान, ‘हे’ पहिल्यांदाच घडलं

Manoj Jarange | मराठा आरक्षणावर राज्यपालांचं महत्वाचं वक्तव्य!

Padma awards 2024 | पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ मान्यवरांचा होणार सन्मान

Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ

Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now