एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि मॅटर सॉल्व, भिवंडीत नेमकं काय घडलं?

On: April 14, 2024 8:30 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Bhiwandi Lok Sabha | लोकसभा निवडणूक तोंडावर असताना महायुती, महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. अनेकांनी आपापल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा दाखवली होती. मात्र उमेदवारांची ताकद आणि जागावाटपाचं गणित पाहता उमेदवार ठरवून देण्यात आले आहेत. यामुळे काही इच्छूक उमेदवारांना उमेदावारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha) मतदारसंघात एकनाथ शिंदे गटातील नेते नाराज आहेत. भिवंडीमध्ये (Bhiwandi Lok Sabha) भाजपच्या कपिल पाटील यांना उमेदवारी दिल्यानं ते नाराज असल्याची माहिती समोर आली, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनमुळे सर्व नाराजी दूर झाल्याचं समजतंय. (Bhiwandi Lok Sabha)

भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha) मतदारसंघ हा महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. मात्र याठिकाणी ऱाष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची ताकद अधिक असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिवसेनेतील अंतर्गत नाराजीमुळे बाळ्या मामा यांना याचा फायदा होऊ शकतो.

शिंदे यांच्या एका फोनमुळे मॅटर सॉल्व

दरम्यान पालघरमधील शिवसेनेचे नेते नाराज आहेत. भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना उमेदवारी दिल्यानं नाराजी व्यक्त केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या एका फोनमुळे त्यांची नाराजी गेली असल्याची माहिती समोर आली आहे.

ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात चांगलं काम करत आहेत. तर आता एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक जागा निवडून आणण्याचं वचन दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी कामाला लागा असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख मारुती धिर्डे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं.

हेमंत गोडसे 9 वेळा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे हे तब्बल 9 वेळा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये तेढ निर्माण झालाय. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत इच्छा दाखवली आहे. यामुळे नाशिकचा तेढ निर्माण झाला आहे. यामुळे आजही हेमंत गोडसे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ठाण्यात गेले आहेत.

News Title – Bhiwandi Lok Sabha In Eknath Shinde Call To Shivsena Party Workers And Solves His Matter

महत्त्वाच्या बातम्या

“अबकी बार गोळीबार सरकार”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“गृहमंत्री, मुख्यमंत्री तुम्ही कुठे आहात?”; विरोधकांनी सरकारला सुनावलं

सलमान खान गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात?, मोठी अपडेट समोर

‘अशा’ पुरूषांनी महिलांपासून चार हात लांब राहावं

युजवेंद्र चहलला पर्पल कॅप मिळूनही धोका?, कारण आलं समोर

Join WhatsApp Group

Join Now