भिवंडीत निवडणुकीनंतर मोठा हिंसाचार; दोन गटांत तुफान दगडफेक आणि राडा, पुढे घडलं भयंकर

On: January 19, 2026 5:21 PM
Bhiwandi Clash News
---Advertisement---

Bhiwandi Clash News | भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर प्रभाग क्रमांक १ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रतिष्ठेच्या लढतीत कोणार्क विकास आघाडीचे विलास आर. पाटील यांचे पुत्र मयुरेश पाटील यांनी भाजप आमदार महेश चौघुले यांचे पुत्र मित चौघुले यांचा पराभव केल्यानंतर दोन गटांत तीव्र वाद निर्माण झाला आहे. या पराभवाच्या धक्क्यानंतर समर्थकांमध्ये असंतोष वाढत गेला आणि अखेर त्याचे रूप हिंसाचारात बदलले. (Bhiwandi Clash News)

निवडणूक निकालानंतरच्या दोन दिवसांत परिसरात तणावाचे वातावरण होते. मात्र रविवारी रात्री परिस्थिती आणखी बिघडली. विलास पाटील समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत असताना समोर आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयात मोठा जमाव जमला. घोषणाबाजी सुरू असतानाच दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि बाटल्यांचा मारा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घरावर हल्ला आणि रस्त्यावर आंदोलन :

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास माजी महापौर विलास पाटील मतदारांचे आभार मानण्यासाठी परिसरात फिरत असताना त्यांच्या निवासस्थानी हल्ला झाला. आरोपानुसार आमदार पुत्र मित चौघुले आणि त्यांच्या समर्थकांनी पाटील यांच्या घरावर दगडफेक करत तोडफोड केली. या घटनेत काही कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या विलास पाटील समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन सुरू असतानाच समोर असलेल्या आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयातही समर्थकांचा जमाव जमला आणि दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद वाढत गेला.

Bhiwandi Clash News | दगडफेक, लाठीमार आणि पोलिस बंदोबस्त :

घोषणाबाजीदरम्यान आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयातून दगडफेक तसेच सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत लाठीमार करून दोन्ही बाजूंचा जमाव पांगवला. (election violence)

या हिंसाचारात दोन जण जखमी झाले असून दगडफेकीत माजी महापौर प्रतिभा पाटील यांनाही दुखापत झाली आहे. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. (Bhiwandi Political Clash News)

दरम्यान, विलास पाटील यांनी आमदार महेश चौघुले आणि त्यांच्या समर्थकांवर थेट आरोप करत पोलिस प्रशासन भाजपच्या बाजूने काम करत असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे आमदार महेश चौघुले यांनी हे आरोप फेटाळून विलास पाटील समर्थकांनी आमच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

News Title : Bhiwandi Clash After Election Results: Stone Pelting, Violence Between Two Groups

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now