२० जानेवारीपासून ‘या’ ३ राशींचे सोन्याचे दिवस सुरू होणार! जाणून घ्या सविस्तर

On: January 19, 2026 2:28 PM
Zodiac Signs
---Advertisement---

Shani Transit 2026 | ज्योतिषशास्त्रानुसार 20 जानेवारी 2026 पासून शनि ग्रह स्वतःच्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करत आहे. हा बदल काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जात असून आर्थिक स्थिती, करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक घडामोडी घडवून आणणार असल्याचे सांगितले जात आहे. शनीला कर्माचा न्यायाधीश मानले जाते, त्यामुळे त्याच्या कृपेने आयुष्यात स्थैर्य, यश आणि समृद्धी येते असे मानले जाते.

सध्या शनि मीन राशीत आहे आणि संपूर्ण वर्षभर तेथेच राहणार आहे. मात्र नक्षत्र परिवर्तनामुळे त्याच्या प्रभावात बदल जाणवणार आहे. 20 जानेवारी रोजी दुपारी 12:13 वाजता शनि उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करेल आणि या संक्रमणाचा सर्वाधिक फायदा तीन राशींना होणार असल्याचे ज्योतिषी सांगतात. या काळात पैसा, नोकरी, व्यवसाय आणि प्रेमजीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. (Saturn Nakshatra Change)

मिथुन आणि कर्क राशींसाठी सुवर्णसंधी :

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ ठरणार आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची शक्यता असून उत्पन्नात वाढ दिसून येईल. नोकरीत असलेल्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होतील. खर्च कमी होईल आणि वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. (Shani Transit 2026)

कर्क राशीच्या लोकांसाठीही हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. व्यवसायात यश मिळण्याची चिन्हे असून नवीन संधी उपलब्ध होतील. परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून विविध स्रोतांतून पैसे येण्याचे योग आहेत. स्थावर मालमत्तेत वाढ होऊ शकते आणि कुटुंबातील आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Shani Transit 2026 | मकर राशीसाठी मोठे यश आणि स्थैर्य :

मकर राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र संक्रमण विशेष शुभ मानले जात आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल आणि करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. एखादा मोठा करार किंवा प्रकल्प मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याचे योग आहेत.

या काळात कौटुंबिक जीवनातही आनंददायी घडामोडी घडतील. मुलांकडून शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य येईल आणि वैवाहिक जीवनात समंजसपणा वाढेल. एकूणच हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी प्रगती, यश आणि समाधान घेऊन येणारा ठरेल. (Zodiac Signs)

शनीचे हे नक्षत्र परिवर्तन तीन राशींसाठी दुप्पट वेगाने प्रगतीचे संकेत देत आहे. आर्थिक लाभ, करिअरमध्ये उंच भरारी आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल यामुळे या राशींच्या लोकांचे आयुष्य नव्या दिशेने वळेल, असा विश्वास ज्योतिषशास्त्रात व्यक्त केला जात आहे.

News Title: Shani Transit 2026: Three Zodiac Signs to See Rapid Growth from January 20

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now