क्रिकेटप्रेमींनो ‘या’ तारखेला रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, पाहा वेळापत्रक

On: January 19, 2026 4:55 PM
Women Asia Cup 2026
---Advertisement---

India vs Pakistan | क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकाच दिवशी दोन टी20 सामने पाहायला मिळणार आहेत. एक सामना आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार असून, दुसरा सामना आशिया कप रायजिंग स्टार्स वूमन्स टी20 स्पर्धेत इंडिया ए वि. पाकिस्तान ए संघांमध्ये रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हा दिवस क्रिकेटचा महोत्सव ठरणार आहे.

वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्समध्येही महामुकाबला :

भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होत असून, या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असून, दोन्ही संघातील कट्टर प्रतिस्पर्ध्यांमुळे हा सामना नेहमीच प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरतो. (IND vs PAK Live)

याच दिवशी थायलंडमध्ये सुरू असलेल्या वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत इंडिया ए आणि पाकिस्तान ए महिला संघ आमनेसामने येणार आहेत. आशियाई क्रिकेट काउन्सिलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हा सामना 15 फेब्रुवारीला खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी असून, त्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे.

India vs Pakistan | सामन्यांची वेळ आणि इंडिया ए संघाचे वेळापत्रक :

या स्पर्धेतील सामने दररोज दोन सत्रांत खेळवले जात आहेत. पहिला सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता, तर दुसरा सामना दुपारी 2 वाजता सुरू होतो. थायलंड वेळ भारतापेक्षा दीड तास पुढे असल्याने भारतात सामने अनुक्रमे सकाळी 8 वाजता आणि दुपारी 12:30 वाजता पाहता येतील. (India vs Pakistan News)

तसेच इंडिया ए महिला संघ 13 फेब्रुवारीला यूएईविरुद्ध, 15 फेब्रुवारीला पाकिस्तान ए विरुद्ध आणि 17 फेब्रुवारीला नेपाळ ए विरुद्ध सामने खेळणार आहे.

News Title: India vs Pakistan to Play Two T20 Matches on 15 February 2026

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now