मेंढ्या चरायला नेल्या तेव्हा फोन आला, बीरदेव ढोणे IPS झाला!; जाणून घ्या प्रेरणादायी कहाणी

On: April 25, 2025 7:57 PM
---Advertisement---

Bhirdev Dhone | सांगायचं झालं, तर स्वप्न (Dream) कुणाचंही असू शकतं, पण त्यासाठी झगडण्याची तयारी लागते. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या यमगे गावातल्या बीरदेव ढोणे (Bhirdev Dhone) या तरुणानं ही गोष्ट खरी करून दाखवली आहे. साधं कुटुंब (Family), वडील मेंढपाळ (Shepherd), आई घरकाम करणारी (Housewife), पण मुलाचा निर्धार मात्र अफाट.

बीरदेवला होती यशाची खात्री 

बीरदेव लहानपणापासून हुशार होता. गावातल्या शाळेत शिकून तो पुढे मुरगूडमध्ये शिक्षणासाठी गेला. दहावी-बारावीत तो नेहमी अव्वल राहत होता. गणितात तर त्याला शंभरपैकी शंभर गुण मिळाले होते. पुढे त्यानं पुण्यातल्या (Pune) सीओईपी (COEP) कॉलेजमधून इंजिनीअरिंग  केलं. पण बीरदेवचं स्वप्न वेगळंच होतं – त्याला आयपीएस (IPS) व्हायचं होतं.

घरच्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. तरीही बीरदेवनं दिल्ली गाठली. तिथं राहून त्यानं UPSC च्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. दिवसाचे २२ तास तो अभ्यासात घालवायचा. कधी जेवण विसरायचा, पण ध्येय मात्र विसरत नव्हता.

निकालावेळी राखत होता मेंढ्या 

बीरदेवला विश्वास होता की, तो नक्की पास होईल. त्याची मुलाखत चांगली झाली होती. आणि नेमकं तसंच घडलं. UPSC 2024 चा निकाल लागला, तेव्हा बीरदेव आपल्या मामाच्या गावी मेंढ्या राखत होता. तिथंच त्याला बातमी मिळाली – तो आयपीएस झाला!

ही बातमी कळताच गावात, तालुक्यात आणि सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचं वातावरण पसरलं. कागल तालुक्यातला पहिला आयपीएस अधिकारी म्हणून त्याचं नाव उजळलं.

बीरदेवची गोष्ट ही फक्त यशाची नव्हे, तर मेहनतीची जिद्दीची आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या जिगरची कहाणी आहे. घर गरीब असलं तरी स्वप्न मोठं असू शकतं, हे त्यानं सगळ्यांना दाखवून दिलं.

Title : Bhirdev Dhone UPSC Toppers 2024 of Yamge village

Join WhatsApp Group

Join Now